Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिशा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी नरसू पाटील, सचिवपदी ब्रह्मानंद पाटील यांची निवड

गडहिंग्लज : येथील दिशा शिक्षण संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा निवडीनंतर सत्कार करण्यात आला.

गडहिंग्लज (प्रतिनिधी ):  दिशा शिक्षण संस्था व विकास केंद्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी नरसू भरमू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी एस. डी. पाटील, सचिवपदी ब्रह्मानंद नरसू पाटील, तर खजिनदारपदी शुभम पाटील यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे यावेळी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


याबाबत संस्थेचे नवनिर्वाचित सचिव ब्रह्मानंद पाटील म्हणाले, नरसू पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि सकारात्मक नेतृत्वामुळे गेल्या तीन वर्षांत संस्थेच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि संस्थेच्या विकासाची तळमळ ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध करून देण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे. दूरदृष्टी असलेले नेतृत्व, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या बळावर कोणतीही संस्था यशाचे शिखर गाठू शकते. आगामी काळात नरसू भरमू पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दिशा शिक्षण संस्था शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या क्षेत्रात आणखी प्रगती करेल,’’ असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. 


ई. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. ज्योती फगरे म्हणाले, तीन वर्षांपासून नरसू भरमू पाटील यांनी संस्थेच्या कामकाजात सक्रियपणे जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता, नवे अभ्यासक्रम आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांवर भर दिला आहे. संस्थेच्या माध्यमातून ‘नरसू पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’ सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. यावेळी ई. बी. गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.          


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.