Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाचा स्तुत्य उपक्रम

गोवा-डिचोली येथील पंढरपूर पायी वारीतील वारकऱ्यांना भोजन शिधा व प्रथमोपचार पेटीचे वाटप




आजरा (प्रतिनिधी ): आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस धरून गोवा राज्यातील डिचोली येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पायदळी वारीतील वारकरी भाविकांचे आजरा शहरात मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने स्वागत करण्यात आले.


या पायी वारीतील वारकरी भक्तांच्या प्रवासातील सोय लक्षात घेऊन, 'आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळ' यांच्या वतीने एका विशेष सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वारीतील वारकऱ्यांना प्रवासात भोजन बनवण्यासाठी आवश्यक असणारा संपूर्ण भोजन शिधा (धान्य व किराणा माल) आणि प्रवासादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी 'प्रथमोपचार पेटी' (First Aid Box) सप्रेम भेट देण्यात आली.


भोजन शिधा मदत

वारीतील भाविकांच्या रोजच्या जेवणाची आबाळ होऊ नये, म्हणून व्यापारी बांधवांनी एकत्र येत दर्जेदार अन्नधान्य व शिधा वारकऱ्यांकडे सुपूर्द केला.


आरोग्याची काळजी (प्रथमोपचार पेटी) 

पायी चालताना पाय दुखणे, किरकोळ जखमा किंवा इतर किरकोळ आजारांवर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी औषधोपचाराने सुसज्ज अशी 'फास्टेड (First Aid) बॉक्स' वारीच्या प्रमुखांकडे सुपूर्द करण्यात आली.



याप्रसंगी आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाचे अध्यक्ष महेश नार्वेकर, खजिनदार संजय हरेर, सचिन इंदुलकर, श्रीपाद कुलकर्णी,  मनोज गुंजाटी, मल्लिकार्जुन तेरणी, मुन्नाभाई लमतुरे, राजेश विभुते, बाळासाहेब पाचवडेकर, अभिजीत इंजल, गौरव देशपांडे, भास्कर बूरुडअमनगी, सतीश कुरुमकर, स्थानिक व्यापारी बांधव, डिचोली वारीतील वारकरी व मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी मंडळाच्या या संवेदनशील आणि परोपकारी उपक्रमाबद्दल वारकरी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजर करत आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत सर्व व्यापारी बांधवांचे आभार मानले.


वारकरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. गोव्याहून अत्यंत श्रद्धेने आणि कष्टाने पंढरीकडे जाणाऱ्या या वैष्णवांच्या मेळ्याला छोटीशी मदत व सेवा करण्याची संधी आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळाला मिळाली, हे आमचे भाग्य आहे.

— प्रतिनिधी, आजरा शहर एकसंघ व्यापारी मंडळ


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.