Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणी पंचक्रोशीतील प्रसिद्ध ज्योतिषी इरय्या हिरेमठ यांचे निधन



गडहिंग्लज : तेरणी (ता. गडहिंग्लज ) येथील प्रसिद्ध ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक इरय्या गुरुपादय्या हिरेमठ (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.  


हिरेमठ यांनी मठामध्ये दीक्षा घेतलेली होती. तनवडी येथील  कलमेश्वर मठात त्यांनी पंधरा वर्षे सेवा केली होती. त्यामुळे त्यांना पंचांग व ग्रहांचा चांगला अभ्यास होता. तेरणी पंचक्रोशीसह कर्नाटकात ज्योतिषी व शास्त्रीय पद्धतीने पूजा पाठ करण्यात ते प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व नागरिकांना निस्वार्थीपणे व नाममात्र शुल्कात ते मार्गदर्शन करत होते. त्यामुळे विविध धार्मिक कार्य व पंचांग विचारण्यासाठी लोकांची गर्दी होत असत. त्यांच्या निधनामुळे  हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.