Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'जागृती'त गुलाल व फटाकेविना रंगली जिमखाना निवडणूक

विद्यार्थी प्रतिनिधी नीरज हवालदार ; विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.अमृता पाटील विजयी 




गडहिंग्लज (संपत सावंत): शहरातील जागृती हायस्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणूक पर्यावरण पूरक आणि लोकशाही मूल्यांना साजेशा वातावरणात अतिशय उत्साही वातावरणात पार पडली. विजयानंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी न करता शिस्तबद्ध पद्धतीने "आम्ही जागृतीचे कारभारी" असा जयघोष करत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला.


विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये राबविण्यात येणारी प्रक्रिया अनुभवता यावी यासाठी उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, माघार, चिन्ह वाटप, मतदारांची संपर्क, प्रचार, कोपरा सभा, गुप्त मतदान आणि मतमोजणी शांततेत पार पडली. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नीरज हवालदार हा ५८ मतांनी तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. अमृता पाटील ४९ मतांनी निवडून आले.१४४९ विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत लोकशाही बद्दलची आपली जागरूकता अधोरेखित केली.


याप्रसंगी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन नूतन विद्यार्थी प्रतिनिधी नीरज हवालदार व विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी अमृता पाटील यांच्या हस्ते झाले. या निवडणुकीत सुमारे ४८ विद्यार्थी प्रतिनिधी निवडून आले ते पुढील प्रमाणे-


मुले- करण सावंत, वेद देसाई, कैवल्य देशपांडे, दिग्विजय पाटील, विराज चव्हाण, प्रतीक सुतार, अभिषेक वाळकी, सोहम गायकवाड, समर्थ देसाई, मारुती भोसले, समर्थ मदकरी, परशुराम गाडीवड्डर, संचित शिंत्रे, श्रेयस कांबळे, हर्षल सुभेदार, अथर्व पाटील, साईराज कुंभार, वेदांत मगदूम, प्रणव दिंडे, सार्थक गुरव, शुभंकर महाजन, ओमकार पाटील, समर्थ जाधव.



मुली-कुमारी आराध्या दिवेकर, कुमारी सान्वी पाटील, कुमारी वेदिका वायदंडे, कुमारी स्वरा फुटाणे, कुमारी आराध्या चौगुले, कुमारी स्वरा खवरे, कुमारी आराध्या शिंदे,कुमारी श्रावणी गावडे, कुमारी श्रुतिका पाटील, कुमारी सोमेश्वरी फुटाणे, कुमारी सेजल गोरूले, कुमारी श्रद्धा इंजल, कुमारी आसावरी पाटील, कुमारी रुशिता तलवाळ, कुमारी स्नेहल गोते, कुमारी नंदिनी पन्हाळकर, कुमारी प्रिया फुटाणे, कुमारी श्रेया पाटील, कुमारी वेदिका शिंदे, कुमारी सौंदर्या पाटील, कुमारी संयुजा पाटील, कुमारी अक्षरा कळेकर, कुमारी श्रावणी बसर्गे.


निवडून आलेल्या सर्व वर्ग प्रतिनिधींचा सत्कार मुख्याध्यापक उमेश सावंत, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, पर्यवेक्षक महंतेश दड्डी यांच्या हस्ते करण्यात आला. ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिमखाना तथा क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत, सचिन मगदूम, प्रकाश हरकारे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.