Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नूलच्या श्री सुरगीश्वर मठात स्वातंत्र्य दिन सोहळा दिमाखात संपन्न; मान्यवरांचा व मठाच्या सेवार्थींचा सत्कार



जरळी (वार्ताहर): आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचा वारसा जपणाऱ्‍या नूल (ता. गडहिंग्लज) येथील प्रसिद्ध श्री सुरगीश्वर मठामध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. मठाधीपती पूज्य श्री गुरुसिद्धेश्वर  शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्याने आणि आशिर्वादाने या राष्ट्रीय उत्सवाची शोभा अधिकच द्विगुणीत झाली.


कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब खराडे व महादेव फुटाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताच्या धून आणि भारतमातेच्या जयघोषाने मठाचा परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णागोंड पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.


स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्‍या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. विविध संस्थांवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल राजकुमार देसाई व राहुल पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच श्री सुरगीश्वर मठाची अखंड सेवा करणाऱ्‍या शेखर कडलगे, सुरेश फुटाणे, श्रीधर हिरेमठ, बाळासाहेब खराडे, महादेव फुटाणे आणि सत्यपा देसाई या सेवार्थींचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला.



या सोहळ्याला भीमा कडलगे, आप्पासाहेब आरबोळे, सुनील मुतनाळे, सदाशिव परीट, बसाराम, लगमाना जैन, नागेश पाटील, बाबुराव चौगुले, कार्तिक स्वामी, बसवराज हिरेमठ यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुप्रसाद गुरव यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.