Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्यावत सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्यात येईल : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार



कोल्हापूर :  छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोई -सुविधा उपलब्ध करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या 195 कोटी रुपयांच्या आराखड्यास लवकरच मंजूरी देण्यात येईल, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिली.


 

विभागीय क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्या संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर क्रिडा विभागाचे उपसंचालक सुहास पाटील उपस्थित होते.


 

 यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी विभागीय क्रीडा संकुल समितीने शासनाकडे सादर केलेल्या रुपयांच्या आराखड्याची माहिती घेवून कोल्हापूरच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केली असून येथे अद्यावत सुविधांची अत्यंत गरज असल्याने हा आराखडा मंजूर करण्याबाबत राज्य क्रीडा विकास समिती यांचे द्वारा प्रस्ताव मंजुरीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.