ओमकार गुरव तुषार चव्हाण
गडहिंग्लज (प्रतिनिधी ): येथील शिवाजी चौकातील काळभैरव गणेशोत्सव मंडळाची नवी वर्षिक कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. सन २०२६-२०२७ सालाकरीता ओमकार बाळासाहेब गुरव यांची अध्यक्षपदी तर तुषार दत्तात्रय चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
मंडळाचे सचिव म्हणून अनिकेत जाधव तर खजिनदार म्हणून प्रमोद विभुते यांना जबाबदारी देण्यात आली. शिवाजी चौकाचे अध्यक्ष बाळासाहेब भैसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी निवडीची बैठक झाली. यंदाचे मंडळाच्या गणेशोत्सवाचे ७० वे वर्ष आहे. यंदा अकरा दिवस अकरा समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्याचे बैठकीत ठरले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेब पाटील, शिवाजी रेडेकर, उदय डोमणे, रमेश पाटील, अजित चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

