Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज येथे मुक्त विद्यापीठाच्या बी. लिब.शिक्षणक्रम प्रवेशास 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ



गडहिंग्लज (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या विद्यापीठाशी सलग्न व UGC, नवी दिल्ली यांची मान्यता असलेला B.Lib. & I.Sc. (ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिक्षणक्रम) या एक वर्षाच्या दूर शिक्षण (Distance Education) पदवी शिक्षणक्रमासाठी डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज (केंद्र क्र.7109A) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी बी.लिब. प्रवेश सुरु झाले आहेत. प्रवेशासाठी पात्रता कोणत्याही विषयातील पदवी (B.A./B.Com./B.Sc.) परीक्षा 50% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 


नोकरी व्यवसाय,  करीत हा कोर्स आपल्याला पूर्ण करता येतो. या कोर्स नंतर माध्यमिक शाळा, सी.बी.एस. ई. स्कूल, कनिष्ठ महाविद्यालये, खाजगी कंपनी ग्रंथालये, शासकीय ग्रंथालये व माहितीकेंद्र, सार्वजनिक ग्रंथालये, इंजिनिअरिंग कॉलेज ग्रंथालय, मेडिकल कॉलेज ग्रंथालय इ. ठिकाणी ग्रंथपाल (Librarian) या पदावर काम करणेची संधी मिळू शकते. सदरचा अभ्यासक्रम दर रविवारी तासिका घेऊन राबविला जातो. प्रवेशाची अंतिम मुदत दि 15 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुक पदवीधारकांनी अधिक माहिती व प्रवेशासाठी डॉ. घाळी कॉलेज ग्रंथालय किंवा मुक्त विद्यापीठ ऑफिस, जागृती हायस्कूल, गडहिंग्लज  येथे संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.