Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजमध्ये शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात



गडहिंग्लज (संपत सावंत) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आणि गडहिंग्लज तालुका क्रीडाशिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय शासकीय १४,१७ व १९ वर्षाखालील मुला- मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या स्व. व्ही. एस. आलूरकर सभागृहात अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.


स्वागत राजाराम माने यांनी तर संपत सावंत यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत विविध शाळांमधून तब्बल २२८ खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू शंकर सावंत यांनी केले. या स्पर्धेतून तीस खेळाडूंची निवड महावीर कॉलेज, कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.



निवड झालेले गटनिहाय खेळाडू पुढील प्रमाणे-

१४ वर्षे मुले(अनुक्रमे) श्रेयस हराडे (सर्वोदय), अनुप चीनगुडे (जागृती), प्रिन्स पाटील (सौ. वि.दि.)दर्शन धुळाज, (मुत्नाळ) आदर्श पाटील (क्रिएटिव्ह) 

१४ वर्षे मुली- कु. तनुजा गुरव (म. फुले महागाव), कु. सानवी खमलेटी( एस.एस. नेसरी), कु. वेदिका चौगुले (सौ. वि.दि.),कु. ऋतुजा हेंडगे (सर्वोदय) कु. आदित्यी गाडवी (जागृती )

१७वर्षे मुले (अनुक्रमे) श्रेयस पाटील (सर्वोदय) स्वरूप साळवे (सौ.वि.दि.) विराट शेवाळे (जागृती) श्रेयस पाटील (जागृती) रितेश शेरेकर (करंबळी) 

१७ वर्षे मुली- कु. निता धुळाज (मुत्नाळ)कु. प्रणिती देशपांडे(सौ .वि.दि.) कु. प्रगती भानवसे (सौ.वि.दि.) कु.वैष्णवी नार्वेकर (वि.के. चव्हाण नेसरी) कु. सिद्धेश्वरी तोडकर (नरेवाडी )

१९ वर्षे मुले (अनुक्रमे) विनीत सुतार अथर्व पाटील गौरेश बिरंजे (सर्व जागृती ज्युनि.) वेदांत हत्तरगी रोहित तडवी (एम. आर )

१९ वर्षे मुली- कु. सिद्धी पाटील (साधना ज्युनि) कु. प्रणवी माने (जागृती ज्युनि) कु.प्रणाली नांदवडेकर (साधना ज्युनि) कु. अनुपमा मगदूम (जागृती जुनि) कु. सेजल पाटील (एम. आर.)

या यशस्वी खेळाडूंचा सत्कार विनायक नाईक, विकास पाटील, संदेश कोकितकर,रमेश चौगुले, सुनील रेडेकर, संतोष देसाई,देवदत्त कांबळे, विनायक शिंदे, दयानंद ग्वाडी,सुभाष तिप्पे, राजेंद्र शेलार, अमित नंद्यानावर अनिल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सूत्रसंचालन मदन दंडगीदास यांनी तर आभार राहुल रेडेकर यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.