Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राजधानीत राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन



नवी दिल्ली :  ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करून महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे अग्रणी योद्धे उमाजी नाईक यांच्या जयंतीदिनी कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. निवासी आयुक्त व सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

 

            

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उमाजी नाईक यांना अभिवादन केले.

 

 यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी दिलेला सशस्त्र लढा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानासाठी केलेला संघर्ष तसेच त्यांच्या शौर्याची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.