Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जरळीत नदीकाठची जमीन खचल्याने ३० टक्के शेतीचे नुकसान, उर्वरित शेतीही धोक्यात; मनसेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वेधले शासनाचे लक्ष

तहसीलदारांना निवेदन; जमीन धसरणे थांबवण्यासाठी संरक्षक भिंत व दगडी बंधारा बांधा - नागेश चौगुले 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील जरळी येथील नदीकाठच्या जमिनी मोठ्या प्रमाणात घसरत असून त्यामुळे आतापर्यंत सुमारे ३० टक्के शेतजमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे. ही जमीन नदीच्या पात्रात वाहून जाण्याची तीव्र शक्यता निर्माण झाल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश शिवाजी चौगुले यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकऱ्यांनी गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना  निवेदन देण्यात आले.


शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान, भविष्यात संकट वाढण्याची भीती


नदीकाठची जमीन सतत खचत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. भविष्यात ही समस्या अधिक गंभीर रूप धारण करू शकते, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागामार्फत या खचणाऱ्या जमिनीची तातडीने पाहणी व मोजणी करून जमीन घसरण्याची मूळ कारणे शोधणे अत्यंत गरजेचे बनले आहे.


त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन खचलेल्या जमिनीची पाहणी व मोजणी करावी, जमीन घसरण्याची कारणे शोधून त्यावर आवश्यक त्या प्रतिबंधात्मक व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, नदीकाठाला आवश्यकता आणि गांभीर्य लक्षात घेऊन संरक्षक भिंत किंवा दगडी बंधारा बांधण्यात यावा,  बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींचे तातडीने पंचनामे करून झालेल्या नुकसानीची नोंद घ्यावी व शासनामार्फत योग्य ती आर्थिक मदत द्यावी. आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत.



या निवेदनावर संजय चौगुले, महादेव चौगुले, मल्लाप्पा चौगुले, विठ्ठल चौगुले, रमेश चौगुले,शिवकुमार  चौगुले, दूंडाप्पा चौगुले, सिद्धाप्पा चौगुले,शांता चौगुले, केम्पन्ना चौगुले, राजू  चौगुले, महादेव चौगुले यांच्यासह अनेक बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.