Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नौकूड येथे श्री भिमशाप्पा मठात दसरा उत्सवाला उत्साहात प्रारंभ; भजनाच्या सुरांनी परिसर गुंजला!

विनापूजन, घटस्थापना आणि सभेनाने सप्ताह सुरू; भीमराव  कडूकर - गुरुजी यांच्यातर्फे सलग पाच दिवस महाप्रसाद




गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थान असलेल्या श्री भिमशाप्पा मठ नौकूड (सामनगड, ता. गडहिंग्लज) येथे यावर्षीचा वार्षिक दसरा सप्ताह उत्सव भक्तिमय वातावरणात व उत्साहात सुरू झाला आहे. शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी विनापूजन, घटस्थापना आणि भजनाच्या जयघोषात उत्सवाचा प्रारंभ झाला. या सप्ताहादरम्यान भाविकांसाठी भीमराव दादू कडूकर - गुरुजी आणि परिवार यांच्या माध्यमातून सलग पाच दिवस दोन्ही वेळेस महाप्रसादाचे मोफत नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मठातर्फे भीमशाप्पा दिवटी यांनी दिली आहे. 


शनिवारी सकाळी संत गोरोबा काका भजनी मंडळ जरळी यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता विधीवत घटस्थापना व विनापूजन संपन्न झाले. त्यानंतर दुपारी विठ्ठल भजनी मंडळ लिंगनुर आणि रात्री हासुरसासगीरी ग्रामस्थ मंडळ यांच्या भजनाने व पहारा कार्यक्रमाने संपूर्ण मठ परिसर भक्तिरसपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाला. 




सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे 


रविवार, ११ रोजी सकाळी ११ ते २: श्री ज्ञानेश्वरी प्रासादिक भजनी मंडळ हिडदुग्गी यांचे भजन, दुपारी ४ ते ७: दत्तपंती भजनी मंडळ तेगीनहाळ यांचे भजन, रात्री १० वाजता: चिंचेवाडी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, महाप्रसाद सकाळी १० ते रात्री १० पर्यंत, सोमवार, १२ रोजी सकाळी ११ ते २ विठ्ठल भजनी मंडळ कुरीराळ (बेळगाव) बाल कलाकार कुमारी अदिती सागर सुतार यांचे भजन,  संध्याकाळी ७ ते १० विठ्ठल रखुमाई सांप्रदायीक भजनी मंडळ कामेवाडी (ता. चंदगड) यांचे भजन,  रात्री १० वाजता: नौकूड ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, महाप्रसाद सकाळी १० ते रात्री १० पर्यंत. मंगळवार, १३ रोजी सकाळी ९ ते १२ विठ्ठल रखुमाई भजनी मंडळ तारेवाडी-नौकुडकर गुरुजी (नेसरी) यांचे भजन, दुपारी १ ते ५: श्री करनाईक भजनी मंडळ तेरणी यांचे भजन, संध्याकाळी ७ ते १०: हनुमान भजनी मंडळ मनवाड यांचे भजन, रात्री १० वाजता: येणेचवंडी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, महाप्रसाद सकाळी १० ते रात्री १० पर्यंत, बुधवार, १४ रोजी सकाळी ११ ते २: महादेव महिला भजनी मंडळ दुग्गुणवाडी यांचे भजन, संध्याकाळी ७ ते १०: दत्त माऊली भजनी मंडळ भडगाव यांचे भजन, रात्री १० वाजता खमलेहट्टी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, महाप्रसाद सकाळी १० ते रात्री १० पर्यंत, गुरुवार, १५ रोजी सकाळी ११ ते २: श्री विठ्ठल भजनी मंडळ गडहिंग्लज यांचे भजन, दुपारी २ ते ५: माऊली हरीपाठ शिप्पूर यांचे भजन, संध्याकाळी ७ ते ११: दत्तपंती संगीत भजनी मंडळ मुगळी यांचे भजन, रात्री १० वाजता: हासुरवाडी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, महाप्रसाद सकाळी १० ते रात्री १० पर्यंत, शुक्रवार, १६ रोजी दसरा समाप्ती, सकाळी ९ वाजता पालखी सभेना, दुपारी १२ वाजता: नुल येथील स्थळदेवाचे पालखी पूजन, दुपारी १२:३० वाजता पासून महाप्रसाद वाटप (भिमशाप्पाची हुग्गी)


शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पालखी सभेना व भिमशाप्पाच्या हुग्गी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी व मित्र परिवाराने सर्व भरगच्च धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठातर्फे भीमशाप्पा दिवटी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.