Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रा. किसनराव कुराडे लिखित 'डॉ. नरेंद्र दाभोलकरांना निमंत्रण पत्र' या ग्रंथाचे सांगली येथे प्रकाशन



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे लिखित ' डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना निमंत्रण पत्र' या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार श्री विजय चोरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. सांगली येथे पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलाताई दाभोलकर होत्या.


प्रारंभी राहुल थोरात यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी लेखक सीतायणकार प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या मनोगतातून अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य नव्या पिढीला समजले पाहिजे. त्यांच्या वैचारिक लढ्याचा वारसा सांभाळणाऱ्या आजच्या व उद्याच्या पिढीला आपल्या परीने बळ देण्यासाठी आणि या पुस्तकातून डॉ. दाभोलकर आणि प्रा.कुराडे यांचे ऋणानुबंध कसे होते हे स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.. या प्रकाशन प्रसंगी डॉ. हमीद दाभोलकर, ॲड. मुक्ता दाभोलकर, उषाताई आरडे मॅडम, श्री गणेश कांबळे,प्रा.पी.एम. भोईटे, श्री करंबळकर -गुरुजी, श्री डेरनो पावलो बार्देस्कर -गुरुजी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.