Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कारगिलच्या द्रास इथल्या पॉइंट 5140 ला ‘गन हिल’ असे नाव

"ऑपरेशन विजय" मधील बंदुका आणि बंदूकधारी यांच्या पराक्रमी योगदानाचा यथोचित गौरव


नवी दिल्ली (सौजन्य: पीआयबी):
भारतीय सैन्यदलांचा रोमहर्षक विजय साजरा करण्यासाठी आणि ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत कारगिल प्रांतातील द्रासच्या पॉइंट 5140 इथे सैनिकांनी गाजवलेले शौर्य आणि बलिदानाचा यथोचित सन्मान करण्यासाठी, या पॉइंटला “गन हिल’ असे नाव देण्यात आले आहे.

भारतीय सैन्याच्या तोफखान्याच्या तुकडीने अचूक हल्ले करत शत्रूच्या सैन्यावर आणि पॉईंट 5140 सह अनेक ठिकाणी त्यांनी घेतलेल्या संरक्षण कवच मोडून काढला होता. ऑपरेशन विजय लवकर यशस्वी करण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते. तोफखाना तुकडीच्या वतीने द्रासच्या कारगिल युद्धस्मारक येथे तोफखाना विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल टी. के. चावला यांनी या मोहिमेत सहभागी झालेल्या शस्त्रधारी वरिष्ठ सैनिकांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण केले. लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता, जनरल ऑफिसर कमांडिंग, फायर अँड फ्युरी कॉर्प्स यांनी देखील याप्रसंगी पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.या कार्यक्रमाला तोफखाना रेजिमेंटमधील सर्व दिग्गज सैनिक , अधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.