Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वडरगे रोडच्या मांगलेवाडी कोपऱ्यावरील अनधिकृत गाळे काढण्याची मागणी

🔘नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

🔘 विकास कामात अडथळा आणणाऱ्यांच्या घरासमोर प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा

गडहिंग्लज : रस्त्यावरील अनधिकृत गाळे हटविण्याच्या मागणीचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना मांगलेवाडी व वडरगे रोड परिसरातील नागरिक.(छाया: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
वडरगे रोडवरील मांगलेवाडी कोपऱ्यावर अनधिकृतपणे रस्त्यावर गाळे ठेवले गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून तातडीने हे गाळे हटवावेत अशी मागणी येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एका निवेदनातून केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, वडरगे रोडवर तीन कोटी पन्नास लाख रुपये खर्चून रस्ता कॉंक्रिटीकरण व गटारीचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून भरघोस निधी प्राप्त झाला आहे. या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मात्र मांगलेवाडी कोपरा येथे दोन अनधिकृत गाळे रस्त्यावर ठेवले गेले आहेत या गाळ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर रस्ता हा राज्य मार्ग आहे त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व वरदळ असते. मात्र हे अनधिकृत गाळे येथे ठेवले गेल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.तसेच यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

सदर रस्त्याचे काम सुरू असताना हे गाळे काढून घ्यावे लागणार या भीतीपोटी विनाकारण कामात अडथळा आणला जात असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मांगलेवाडी व वडरगे रोड येथील नागरिकांच्या सोयीसाठी हा रस्ता व दोन्ही बाजूचे गटारी होणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र काही मंडळी चुकीची माहिती देऊन काम बंद पडण्याचे कारस्थान करत असल्याचा आरोप देखील या निवेदनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीचे काम होत असताना विनाकारण रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण करू नये असे निवेदनात म्हटले आहे. विनाकारण रस्त्याच्या कामात अडथळा आणल्यास प्रसंगी अशा विकास कामाच्या आड येणाऱ्यांच्या घरासमोर उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा नागरिकांनी या निवेदनातून दिला आहे.

या निवेदनावर जयवंत अस्वले, भीमराव माने, शुभम नलवडे, बाळकृष्ण भाग्यवंत, परशराम रोटे, बाळासाहेब सावंत, एल.डी. पोवार, ऐश्वर्या मोदर, आर.डी. डोमणे, रमाकांत शिंदे, अशोक वाली, सागर वाली, इरफान मुजावर, डॉ. अनिलराव कुराडे, अमर मांगले, डॉ.महेश चौगुले, चिंतामणी वाली, धनंजय मोरबाळे यांच्यासह येथील बहुसंख्य नागरिकांच्या सह्या आहेत.

नागरिकांच्या भावना पहा व्हिडिओच्या माध्यमातून



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.