Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंचनाळ येथे माजी सैनिक विजयकुमार सावंत यांच्याकडून मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

इंचनाळ : माजी सैनिक विजयकुमार सावंत यांच्यामार्फत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग.

गडहिंग्लज ( प्रतिनिधी) :
इंचनाळ (तालुका गडहिंग्लज) येथील माजी सैनिक विजयकुमार सावंत यांनी गजानन विद्या मंदिरातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विजयकुमार सावंत हे  ग्रीफमध्ये (जी.आर.ई.एफ) ३९ वर्षे प्रदीर्घ सेवा बजावून नुकतेच निवृत्त झाले आहेत. याबद्दल त्यांनी गजानन विद्या मंदिर येथील इयत्ता पहिले ते चौथी पर्यंतच्या मुलांना वह्या व पेन वाटप केले. या कार्यक्रमास आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते.

या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.