Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला

🔘देशात सध्या १३ लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहने वापरात 

🔘इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी केंद्र सरकारचे प्रोत्साहन 


नवी दिल्ली (सौजन्य : पीआयबी) :
भारतात सध्या एकूण १३, ३४, ३८५ इलेक्ट्रिक वाहने आणि २७,८१,६९,६३१ बिगर-इलेक्ट्रिक वाहने वापरात आहेत. ई-वाहन पोर्टल (रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय) भारतातील रस्त्यांवरील इलेक्ट्रिक वाहने आणि एकूण वाहनांची तपशीलवार माहिती दिलेली आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यामध्ये जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि वाहनांच्या उत्सर्जनाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने २०१५ मध्ये फेम इंडिया योजनेचा जलद गतीने अवलंब करण्यात आला. सध्या फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१९  पासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी सुरु आहे. यासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 केंद्र सरकारने देशातील बॅटरीच्या किमती कमी करण्यासाठी १२ मे २०२१ रोजी ॲडव्हांस्ड केमिस्ट्री सेल (ACC) च्या उत्पादनासाठी उत्पादन-संलग्न- प्रोत्साहन  (PLI) योजनेला मंजुरी दिली. बॅटरीच्या किमतीत घट झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होण्यास मदत झाली आहे. १५ सप्टेंबर २०२१ रोजी मंजूर झालेल्या ऑटोमोबाईल आणि वाहन उद्योगातील उपकरणांशी संबंधित उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजनेंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी २५,९३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी  १२ % वरून ५% करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जर/चार्जिंग स्टेशनवरील जीएसटी १८% वरून ५% करण्यात आला आहे.बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना हिरवी परवाना प्लेट दिली जाईल तसेच परवान्याच्या आवश्यकतांमधून सूट दिली जाईल, अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केली आहे.तसेच सर्व राज्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवरील पथकर  माफ करावा अशी सूचना देणारी अधिसूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची प्रारंभिक किंमत कमी होण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.