Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जवान उदय घुगरे यांच्यावर जरळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जरळी : जवान उदय घुगरे यांचे अंत्यदर्शन घेताना पत्नी गीता, मुलगा शौर्य व नातेवाईक.

जरळी (वार्ताहर) :
उत्तराखंड येथे सेवा बजावताना हृदयविकाराने निधन झालेले जवान उदय महादेव घुगरे यांच्यावर जरळी (तालुका गडहिंग्लज) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनावेळी पत्नी दीपा हीचा अबोला, वडील महादेव व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या होत्या.

जरळी येथील हिरण्यकेशी बंधाऱ्यापासून अंत्ययात्रेला सुरवात झाली. यावेळी जरळीसह पंचक्रोशीतील नागरिक अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अंत्यसंस्कारस्थळी पटांगणात पार्थिव आल्यानंतर पत्नी गीता, वडील महादेव, आई शांता यांच्यासह अन्य नातेवाईक यांनी अंत्यदर्शन घेतले. 


 यावेळी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार दिनेश पारगे, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचे चंद्रशेखर पांगे,  अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, सोमगोंडा आरबोळे, विकी कोणकेरी, राजू खमलेटी, रमेश आरबोळे, वीर मराठाचे अध्यक्ष कॅप्टन रवी मंडलिक, कोल्हापूर जिल्हा सैनिक फेडरेशनचे उपाध्यक्ष सदाशिव घेवडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. पिथोरागड युनिटचे सुभेदार शामचंद्र सिन्हा आणि कर्नल ऑफ मराठा रेजिमेंटच्या वतीने  भगवान रेडेकर यांच्या मानवंदनेनंतर मराठा लाईफ इन्फन्ट्रीच्या जवानांनी मानवंदना दिली. यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे कुमार पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे माजी सैनिक उपस्थित होते.

जरळी : जवान उदय घुगरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिक.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.