गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज कॉलेज ऑफ फार्मसी च्या एन.एस.एस विभागाच्या वतीने लिंगनूर (तालुका गडहिंग्लज) येथे आंबा, चिंच, जांभूळ या विविध प्रकारच्या ५० झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
लिंगनूर : शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या एन.एस.एस विभागाच्या वतीने वृक्षारोपण प्रसंगी सरपंच सौ. परमेश्वरी पाटील यांच्यासह इतर.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य डॉ.संतोष कुरबेट्टी यांनी केले. या कार्यक्रमास सरपंच सौ. परमेश्वरी पाटील, ग्रामसेवक सौ. रेश्मा मेटील यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, ग्रामस्थ, प्राध्यापक, एन.एस.एस.चे स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार एन.एस.एस विभागाचे प्रमुख प्रा. प्रणव सावेकर यांनी मानले.


