![]() |
| तेरणी : येथील बचत गटांना कर्ज वाटप करताना एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी. यावेळी उपस्थित सरपंच मोसीम मुल्ला, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर. 🔘"उमेद"च्या माध्यमातून गावात बचत गट चळवळीला यश |
🔘ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे बचत गट चळवळीला गती
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी येथील चार बचत गटांना एचडीएफसी बँकेमार्फत प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मोसीम मुल्ला, ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर, एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी, बचत गटाच्या सीआरपी सानिया मुल्ला यांच्यासह चारही बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
तेरणी येथे आठ महिन्यापूर्वी बचत गटाची चळवळ सुरू करण्यात आली. या ठिकाणी महिलांकडून बचत गटासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक बचत गट गावात स्थापन करण्यात आले आहेत. गडहिंग्लज पंचायत समितीकडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत ही चळवळ तेरणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.
ह्या अभियानाच्या वर्धिनी अर्चना वडर, शुभांगी खटावकर, पंकजा कांबळे यांनी उमेद विभागातील अधिकारी बी. एन. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली या बचत गटांना मार्गदर्शन करत यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य केले होते. तेरणी ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोठे पाठबळ या अभियानाला मिळाल्याने या चळवळीला चांगले यश आले आहे. तत्कालीन ग्रामसेवक अशोक शेळके यांचेही सहकार्य या कामी लाभले आहे. या चळवळीला एचडीएफसी बँकेने अर्थसहाय उपलब्ध करून देत आर्थिक पाठबळ दिल्याने या बचत गटांना एक नवी उमेद मिळाली आहे. या बचत गटातील चार बचत गटांना एचडीएफसी बँकेने प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे कर्ज मंजूर केले असून त्याचे वाटपही करण्यात आले.



