
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालय व संभाजीराव माने जुनियर कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यम वाणिज्य विभाग यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.एम.कदम होते. स्वागत व प्रास्ताविक स्वरूप नाईक यांनी केले. यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून प्रत्येकाच्या जीवनात आई-वडील व गुरुना आदराचे स्थान आहे. आपल्या जीवनातील गुरु आपण सर्वांना महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचवीत असतात. गुरूंच्या सानिध्यात राहून आपण आपल्या जीवनाला गती देण्याचा प्रयत्न करीत असतो, यातूनच आपण खऱ्या अर्थाने घडत असतो असे त्यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ. एस. एम.कदम म्हणाले, जीवनामध्ये शिक्षकाची फार गरज आहे. शिक्षक नसते तर डॉ.कलाम घडले असते का ? डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी आपल्या जीवनात आपल्या गुरुना महत्व दिले. गुरूमुळेच डॉ.कलाम हे खऱ्याअर्थी घडले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही. चौगुले, डॉ.आर.पी.हेंडगे, इंग्रजी माध्यम वाणिज्य विभाग समन्वयक प्रा. महेश चौगुले आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी ओंकार गाईंगडे, प्रार्थना देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास डॉ.बी.एम.जाधव, प्रा. ए.बी.कोकणे, प्रा. वृषाली हेरेकर, प्रा. अनिता पोवार यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा. बियामा वाटंगी यांनी मानले. सूत्रसंचालन सानिया मुल्लाणी, आर्या चव्हाण, आदिती शिंदे, अनुष्का आयरे यांनी केले.
