मुगळी येथे सोमलिंग मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न
![]() |
| मुगळी : येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा.राजू माळगी. यावेळी उपस्थित गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, राजेंद्र गड्यानावर व इतर मान्यवर. |
जरळी( वार्ताहर): आपल्या हृदयामध्ये दोन गोष्टी साठविले पाहिजे एक म्हणजे जन्म देणारी आई व जिवनाला आकार देणारा गुरु असे मत प्रा.राजु माळगी यांनी मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथील सोमलिंग मंदिरात गुरुपौर्णिमा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी बोलताना प्रा.माळगी पुढे म्हणाले, जोपर्यंत आपल्या घराला गुरुचे पाय लागत नाही तोपर्यंत घराला घरपण नाही. गुरुमध्ये प्रचंड ताकत आहे. आपल्याला शहाणपण गुरु देतो. माणसाचा जन्म व मृत्यू ठरलेला आहे मात्र गुरु आपल्या आयुष्यामध्ये येत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवस गोड होत नाही . ज्ञान हे गुरूंच्या सानिध्यामुळे मिळते ते दुकानात मिळत नाही. त्यामुळे आपल्या जीवनात आईला व गुरूला फार मोठे महत्त्व आहे.
सुरवातीला चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी श्री गुरुसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह रमेश आरबोळे यांचा सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमास राजेंद्र गड्यानावर यांची प्रमुख उपस्थिती होती . बाल अवधूत भजनी मंडळ यांनी भजन सेवा केली. स्वागत प्रा. आपासो आरबोळे यांनी केले .आभार रमेश आरबोळे यांनी मानले.

