Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शहरी फिडरवरून वीज पुरवठा करा

🔘गडहिंग्लज शहर हाळलक्ष्मी नगर वार्ड क्रमांक १९ मधील नागरिकांची मागणी

🔘महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर

गडहिंग्लज : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना हाळलक्ष्मी नगर वार्ड क्रमांक १९ मधील रहिवाशी. ( छाया: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
गडहिंग्लज शहर हाळलक्ष्मी नगर वार्ड क्रमांक १९ झोन ३ मधील रहिवाशांसाठी शहरी फिडरवरून विद्युत पुरवठा करण्याची मागणी येथील नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, हाळलक्ष्मी नगर वार्ड क्रमांक १९ झोन ३ मधील राहणाऱ्या वस्तीमध्ये जो विद्युत पुरवठा होतो तो ग्रामीण फिडर वरून होतो. परिणामी विविध नैसर्गिक कारणांमुळे तसेच वादळ व जोराचा पाऊस झाल्यास बऱ्याच वेळा रात्री अपरात्री वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. प्रसंगी दोन दोन दिवसही विद्युत पुरवठा बंद असतो. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारात बसावे लागते. येथील वस्ती शहरी भागात असताना देखील ग्रामीण फिडर वरून विद्युत पुरवठा होत असल्याने या समस्येला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. शेजारील वस्तीमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत असतो मात्र वार्ड क्रमांक १९ मधील राहणाऱ्या लोकांना मात्र अंधाराचा सामना करावा लागतो.नगरपालिकेकडे घरफाळा शहरी पद्धतीने भरले जाते. तरी येथील रहिवाशांना शहरी फिडर वरून विद्युत पुरवठा करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर अभियंता एस. आर.कांबळे, प्रकाश पाटील, कैलास शिंदे,प्रकाश मस्कर आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.