दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार शिबीर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आय. एम.ए आणि गडहिंग्लज नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक २१ जुलै रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ८ व ९ मध्ये चिकनगुनिया , डेंग्यूची मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे तपासणी शिबीर भिमनगर समाजमंदिर, नगरपरिषद शाहू सभागृह, सावित्रीबाई फुले विद्यालय या ठिकाणी आयोजित केले आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगसेवक हारूण सय्यद यांनी केले आहे.
भिमनगर समाजमंदिर येथे डॉ.योगेश बिरजे, डॉ. राकेश बेळगुद्री,डॉ. सचिन रेंदाळे,डॉ.मुकुंद जाधव,डॉ. शैलेश ढबु, डॉ. मोतीराम बारदेस्कर ,डॉ. किशोर घेवडे, डॉ. राजश्री पट्टणशेट्टी, डॉ.स्वाती इंगवले. शाहू सभागृह येथे डॉ. किरण हत्ती,डॉ.रोहित देसाई,डॉ. शैलेश देशपांडे,डॉ.मिलिंद साळुंखे,डॉ.गजानन गलगले,डॉ.प्रीती माने,डॉ.किरण खोराटे, डॉ.मोहिनी दांडेकर. सावित्रीबाई फुले विद्यालय येथे डॉ. व्ही.आय.पेडणेकर, डॉ. प्रकाश वाली, डॉ.रणजित पाटील,डॉ.अनुपमा जाधव,डॉ.विजय रुद्रापगोळ ,डॉ. भरतेश कमल,डॉ.सिध्दार्थ पाटणे, डॉ.सुरेश संकेश्वरी तपासणी करणार आहेत.

