 |
| गडहिंग्लज : संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित पालक मेळाव्यास उपस्थित मान्यवर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पालक प्रतिनिधी सखाराम फडके व महिला पालक प्रतिनिधी जया खानापुरे होते.
स्वागत व प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही.चौगुले यांनी केले. या मेळाव्यामध्ये संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी पालकांनी आपल्या पाल्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. शिवाय महाविद्यालयात वेळोवेळी भेट देऊन आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे गरजेचे आहे. पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात खऱ्या अर्थी समन्वय साधला तरच विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे शक्य होणार आहे असे स्पष्ट करून त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
 |
गडहिंग्लज: पालक मेळाव्यास उपस्थित पालक व विद्यार्थी.
यावेळी प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांनी परीक्षा विभागाचा आढावा घेतला. प्रा.एम. के. नोरेंज यांनी मार्गदर्शन केले. प्रा.जालंदर दोरुगडे यांनी नीट, जेईई व सीईटी या प्रवेश परीक्षा बाबत मार्गदर्शन केले. प्रा. स्मिता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या निकालाची माहिती दिली. प्रा. रोशन पाटील यांनी वार्षिक नियोजनाची माहिती दिली. पालक प्रतिनिधी सखाराम फडके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पालक विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थी हित जोपासणे शक्य आहे, त्यासाठी पालकांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. यावेळी सर्व प्राध्यापक, बहुसंख्य पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजना पाटील यांनी केले तर आभार प्रा.आर.एस. सुतार यांनी मानले. |