🔘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शोएब अत्तार करणार मार्गदर्शन
🔘तेरणी व परिसरातील तरुण मुला-मुलींनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ग्रामपंचायत तेरणी यांच्या वतीने तेरणी व परिसरातील तरुण मुला-मुलींसाठी महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्यामधील असणाऱ्या करियर संधी व त्यासाठी लागणारी तयारी या विषयावर रविवार दि.३१जुलै रोजी सकाळी १० वाजता राजर्षी शाहू सभागृह, ग्रामपंचायत येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक -SGI कोल्हापूरचे शोएब अत्तार यांचे व्याख्यान आयोजीत केले आहे. इच्छुकानी आपली नावे https://forms.gle/fW1WcRiFrNHcDvbs9 लिंकवर नोंदवावीत असे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आले आहे.

