Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये कॉमर्स विभागाचा शिक्षक- पालक संवाद मेळावा उत्साहात

गडहिंग्लज : येथील संभाजीराव माने ज्युनिअर कॉलेजमध्ये पालकांचा सत्कार करताना प्रा.सौ. बिनादेवी कुराडे. यावेळी सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम व इतर.

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजच्या कॉमर्स विभागाचा शिक्षक पालक संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पालक प्रतिनिधी डॉ. महेश चौगुले तर महिला पालक प्रतिनिधी सविता चव्हाण होते. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
 स्वागत व प्रस्ताविक पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही. चौगुले यांनी केले. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे म्हणाले,  वाणिज्य शाखेतून व्यवहार ज्ञानाची माहिती मिळते. यातून बरेच काही शिकण्याची संधी प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून आपले करिअर घडवावे असे त्यांनी सांगितले. यावेळी सी.ए. इंटर परीक्षा उत्तीर्ण झालेले महाविद्यालयाचे निखिल जोशी, समेध पाटील यांचा व अकरावी कॉमर्स मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम.कदम, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. कदम, प्रा. आशा पाटील, प्रा. जयवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

 यावेळी जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे यांच्यासह कॉमर्स विभागाचे सर्व प्राध्यापक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रियांका जाधव व प्रा. गीता देसाई यांनी केले. आभार तानाजी भांदुगरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.