![]() |
| संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे विद्यार्थ्यांना फी सवलत लाभार्थी पत्र वाटप प्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत, प्राचार्य डी. बी. केस्ती, प्रा.मोसिम मुल्ला व इतर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संत गजानन महाराज शिक्षण समुहामध्ये फी सवलत लाभार्थी पत्राचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
एस.जी.एम शिक्षण समूहाने विविध शाखांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी एस. जी. एम.फी सवलत योजना २०२०- २१ पासून सुरू केले आहे. या अंतर्गत विविध १६ शाखांमध्ये २४ अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेअंतर्गत पात्र आहेत. २०२१-२२ मध्ये सदर योजनेचा ५९ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांना संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एच.सावंत व संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निक महागावचे प्राचार्य डी.बी. केस्ती यांच्या हस्ते लाभार्थी पत्र व धनादेश वितरित करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता व संशोधन वाढीसाठी शिक्षण संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमासाठी शिक्षण समूहाचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. अमोल माने यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. बी.पोवार यांनी केले. आभार प्रा. एम.जी.मुल्ला यांनी मानले.


