🔘कारगिल युद्धातील साहसी सुपुत्रांना शत-शत नमन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
🔘संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, संरक्षण सचिव आणि तिन्ही सेना दलांच्या प्रमुखांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर वाहिली आदरांजली
पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील शूरवीरांना आदरांजली वाहिली. ट्विटर संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे की,"कारगिल विजय दिवस भारतमातेच्या सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतिक आहे. याप्रसंगी, मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची पराकाष्ठा करणाऱ्या देशातील सर्व साहसी सपुत्रांना माझे शत-शत नमन। जय हिंद!"
आपल्या ट्विट संदेशात संरक्षण मंत्र्यांनी शूरवीरांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. भारताच्या इतिहासातील अजरामर क्षण म्हणून ते कायमचे कोरले जातील असे म्हणाले.
द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकासह देशभरात कारगिल युद्धातील शहीद वीरांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कारगिल युद्धादरम्यान भारतीय लष्कराच्या शूर सैनिकांनी, भारतीय वायुसेनेच्या मदतीने अनंत अडचणी, प्रतिकूल भूभाग आणि प्रतिकूल हवामानावर मात करून रणभूमीत उंचीचा फायदा असलेल्या ठिकाणावरील शत्रूवर विजय मिळवला.


