Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय निवडणुका उत्साहात

गडहिंग्लज: मुख्याध्यापिका सौ. गौरी शिंदे यांच्या समवेत श्रावणी पाटील, मिसाबा कमते, श्रीवर्धन म्हैत्री, रोशन पाटील. (छाया: मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज (प्रतिनिधी): 
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय निवडणुका उत्साहात पार पडल्या.

या निवडणुकीमध्ये सोमवारी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्रीवर्धन विजय म्हैत्री, विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मिसाबा रियाज कमते यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर विविध खात्यांचेही वाटप करण्यात आले. निवडणुक अधिकारी म्हणून सौ. रिटा मिनिंजिस, दीपा आंबोलकर, भारती लोहार, काशिनाथ बारामती, सौ नेहा  नेर्लीकर ,सौ. संगीता पाटील, सौ. सरिता तहसीलदार, किरण कावणेकर यांनी काम पाहिले. यासाठी मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.