![]() |
| गडहिंग्लज : येथील हाळलक्ष्मी वाचनालयात डॉ.एस.आर रंगनाथन यांच्या जयंती प्रसंगी अध्यक्ष राजेंद्र खोराटे, राजेंद्र वडगावे, सौ.वर्षा रोटे, वर्षा शेटके, वंदना साबळे आदी. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री.हाळलक्ष्मी वाचनालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर.रंगनाथन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सौ.वर्षा रोटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
प्रारंभी राजेंद्र वडगावे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे यांनी स्वागत केले. वर्षा शेटके, सौ.विमल आडावकर, आनंदा खेडेकर,अनिता खोराटे यांच्यासह वाचक, सभासद उपस्थित होते. ग्रंथपाल वंदना तोडकर यांनी आभार मानले.

