🔘डॉ. क्रांतीताई सावंत यांची माहिती
🔘गडहिंग्लजला आढावा बैठक
![]() |
| गडहिंग्लज : आढावा बैठकीत बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत.यावेळी उपस्थित इतर मान्यवर. (छाया : मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा प्रभारी डॉ. क्रांतीताई सावंत यांनी दिली. गडहिंग्लज येथे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना डॉ. क्रांतीताई सावंत म्हणाल्या, गडहिंग्लज तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका असून २०१९ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला लोकांनी भरभरून मते दिली आहेत. त्यावेळी पक्षाची संघटनात्मक बांधणी झालेली नव्हती परंतु आता मात्र तालुक्यात संघटनात्मक बांधणी झाली असून पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. पक्षाचा विचार वंचित बहुजन आघाडी हे सत्तेपासून वंचित असणाऱ्यांच्या हाती देण्यास तयार आहे. पक्षाच्या धोरणानुसार ५० टक्के जागा ओबीसी बांधवांना दिल्या जाणार आहेत. अनेक उमेदवार पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या वंचित ठेवल्या गेलेल्या वंचित बहुजन समाजाने पुढे यायचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आपल्या हाती घ्यावी असे आवाहन डॉ.सावंत यांनी केले.
बैठकीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे. स्थानिक स्तरावर समविचारी पक्ष संघटना पुढे आल्या तर त्यांच्यासोबत युती करून निवडणुका लढण्याचा पर्याय सुद्धा आमच्या समोर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला गडहिंग्लज तालुका अध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, जिल्हा महासचिव भीमराव नंदनवाडे, जिल्हा उपाध्यक्ष रशीद सिकलगार, संतोष सुळकुडे, जिल्हा प्रवक्ते एस.आर. कांबळे, जिल्हा सचिव महादेव कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कल्पना कांबळे, प्राचार्य साताप्पा कांबळे, प्रा.डॉ.डी.जी चिघळीकर, मधुराज धम्मदीक्षित, बसवराज कांबळे, देवदास शेषनाईक, दीपक कांबळे, संदेश कांबळे, आकाश नाईक, सोमनाथ कांबळे, साहिल तिऊरवाडकर, प्रसाद कांबळे, बाळासाहेब कांबळे, कुलदीप कांबळे, जयदीप कांबळे बाळाप्पा कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती गण गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



