Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सेवानिवृत्ती निमित्त केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले यांचा तेरणीत सत्कार

तेरणी: केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई. यावेळी उपस्थित जि.प.चे माजी सदस्य जयकुमार मुन्नोळी, श्रीमती रेखाताई हत्तरकी, गंगाधर व्हसकोटी, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, सरपंच मोसिम मुल्ला, मुख्याध्यापिका सौ. मगदूम, सिद्धाणा देसाई व इतर

गडहिंग्लज (प्रतिनिधी):
सेवानिवृत्ती निमित्त हलकर्णी केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख व तेरणी गावचे सुपुत्र मल्लाप्पा इंगवले यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख इंगवले यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई होते.

तेरणी : केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित विविध मान्यवरांनी केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले यांना शुभेच्छा देत त्यांनी गेली ३८ वर्षे बजावलेल्या सेवेबाबत सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. सत्कार मूर्ती केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले यांनी सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली, तसेच जोपर्यंत आपले शरीर साथ देईल तोपर्यंत अविरतपणे मी शिक्षणाचे कार्य करीत राहीन असे सांगितले.
तेरणी: कार्यक्रमास उपस्थित पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई, माजी जि.प. सदस्या रेखाताई हत्तरकी, जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील व इतर.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमती रेखाताई हत्तरकी, माजी सदस्य जयकुमार मुन्नोळी, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. रूपाली कांबळे, श्रीमती अनुसया सुतार, पंचायत समितीचे माजी सदस्य व जनता दलाचे तालुका अध्यक्ष बाळेश नाईक, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर व्हसकोटी, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, तेरणीचे सरपंच मोसिम मुल्ला, उपसरपंच अक्काताई हजेरी, संगमेश्वर सेवा संस्थेचे चेअरमन अण्णासो देसाई, सिद्धाणा देसाई, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. गीता फडके, मराठी विद्या मंदिर तेरणीच्या मुख्याध्यापिका सौ.मगदूम यांच्यासह ग्रामपंचायत, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच मराठी विद्या मंदिर तेरणीचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.अंकली यांनी केले.

==========================

अविरतपणे शिक्षणाचे कार्य करीत राहणार : केंद्रप्रमुख मल्लाप्पा इंगवले
(व्हिडिओ पाहण्यासाठी 👇येथे क्लिक करा)





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.