Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज शहरातील इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश निवड यादी उद्या जाहीर होणार

गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची माहिती


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया गडहिंग्लज शहर निवड यादी दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता घोषित करण्यात येणार आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी दिली.

  प्रत्यक्ष प्रवेश दिनांक ८, ९, १० व ११ ऑगस्ट रोजी आपल्याला मिळालेल्या कॉलेजवर करता येणार आहे. प्रवेश प्रक्रिया संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तक्रार निवारण केंद्र एम.आर.हायस्कूल गडहिंग्लज येथे दिनांक ८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेत करता येईल. कॉलेज दिनांक १२ ऑगस्ट रोजी सुरू होतील असे गटशिक्षणाधिकारी हालबागोळ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.