🔘`हर घर तिरंगा' अभियानसाठी नियोजन
🔘विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई (सौजन्य : पीआयबी): ‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री तसेच वितरण प्रक्रिया सुलभतेने पार पाडता यावी म्हणून महाराष्ट्रासह देशातील सर्व टपाल कार्यालयांचे स्वातंत्र्य दिनापर्यंत सुटीच्या दिवशीही राहणार आहे. महाराष्ट्र परिमंडळाचा विस्तार लक्षात घेतला तरी या मंडळातील १०,९३९ टपाल कार्यालयांना विक्रीसाठी राष्ट्रध्वज पुरविण्यात येणार आहेत. या टपाल कार्यालयांना सुमारे सहा लाख अठरा हजारांहून अधिक राष्ट्रध्वज पुरवण्यात आले आहेत.
लोकांना या अभियानात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध
टपाल कार्यालयांमध्ये `हर घर तिरंगा' अभियानाची माहिती देणारे फलक तसेच सेल्फी बोर्ड
लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र तसेच गोवा येथील नागरिकांना `हर घर तिरंगा' अभियानाचे
महत्त्व समजावून सांगण्यासाठी टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे २४ प्रभात
फेऱ्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत आज ७, आणि १४ ऑगस्ट रोजी
येत असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील प्रत्येक
टपाल कार्यालयातील किमान एक खिडकी सुरु ठेवून जनतेला राष्ट्रध्वजाची विक्री
करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व टपाल वितरण कार्यालयांमध्ये
राष्ट्रध्वजांच्या वितरणासाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

