![]() |
| गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात जागतिक क्रीडा दिन कार्यक्रमाप्रसंगी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्यासह प्राध्यापक वर्ग. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात जागतिक क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे व प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख डॉ.राहुल मगदूम यांनी केले. यावेळी राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सृष्टी रेडेकर व राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल साक्षी चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, खेळाडू, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा. जयवंत पाटील यांनी मानले.


