Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भक्तांना "बाप्पांच्या"आगमनाची आतुरता

🔘गणेश भक्तांचा उत्साह शिगेला

 🔘 मूर्तिकारांकडून गणेश मूर्तींवर अखेरचा हात


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
उद्या बाप्पांचे आगमन होत असल्याने गणेश भक्तांना बाप्पांच्या आगमनाची आतुरता लागली आहे. मूर्तीकारही गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार असल्याने सर्व गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बाप्पांच्या आगमनाची तयारी सर्व गणेशभक्त करत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. घराची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट गणेश भक्त करत आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्तेही मंडप डेकोरेशन कामात गुंतले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाच्या महामारीतून देश सावरत आहे त्यामुळे उत्साही वातावरण पाहायला मिळत आहे. बाप्पांच्या कृपेने कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे अशी प्रार्थना सर्व गणेशभक्त करीत आहेत.

गेले तीन-चार महिने मूर्ती कामात व्यस्त असलेले मूर्तिकार देखील गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. आकर्षक गणेश मूर्ती बनवण्यासाठी हे मूर्तिकार रात्रंदिवस राबत आहेत. प्रत्येक गणेश मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी हे मूर्तिकार आपले सर्व कौशल्य पणाला लावत आहेत. 

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला तालुक्यातील तेरणी येथील मूर्तिकार भीमा सुतार, पवन सुतार व रघु सुतार यांच्या घरी भेट दिली असता गणेश मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे दिसले. हे मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवत होते.

याठिकाणी एकापेक्षा एक सुंदर व आकर्षक गणेश मूर्ती पाहावयास मिळाल्या. उद्या सर्वांना वेळेत गणेशमूर्ती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे मूर्तिकार युद्धपातळीवर तयारी करत असल्याचे चित्र दिसले. एकंदरीत तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी गणेश भक्तांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.