![]() |
| गडहिंग्लज: शहरात घरगुती गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना गणेशभक्त. (छाया : मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी):गडहिंग्लज शहरासह तालुक्यात विघ्नहर्ता गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात घरगुती गणेश मूर्तींची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासूनच नागरिकांची गणेशमूर्ती आणण्यासाठी कुंभारवाड्यांमध्ये गर्दी दिसून आली.
फटाक्यांची आतषबाजी, ढोल- ताशे यासह विविध वाद्यांच्या गजरात आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. कोरोनामुळे दोन वर्ष सण, समारंभांवर निर्बंध होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तब्बल दोन वर्षानंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. गणरायाच्या स्वागतासाठी आबालवृद्धांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मुर्तींची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना केली.
गडहिंग्लज शहरातील गणेश भक्तांची छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार यांनी टिपलेली छायाचित्रे👇





















