Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या कलाप्रेमी गणेश उत्सव मंडळाचा नवसाला पावणारा गणपती


महागाव (वार्ताहर):
महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील कलाप्रेमी गणेश उत्सव मंडळाचा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

 या मंडळाची स्थापना १९८२ साली करण्यात आली. मंडळाने यावर्षी देखील आकर्षक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या मंडळाच्या ख्यातीची परंपरा सध्या तिसऱ्या पिढीने अखंडितपणे सुरू ठेवली आहे. 

या मंडळाने यंदा ऐतिहासिक घडामोडींवर जिवंत देखाव्याचे नियोजन केले आहे.  रांगोळी कलाकृतींसारखे उपक्रम या मंडळाने राबविले आहे.  

विशेष म्हणजे या मंडळाच्या समोरील बाजूस दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, पीर नालसाब मंदिर, भावीश्री मंदिर आहेत. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना या देवांचेही दर्शन येथे होते.

या मंडळाने हिंदू- मुस्लिम ऐक्याची परंपरा अखंडितपणे जपली आहे. दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रमजान ईद, बकरी ईद, मोहरम आदी सण हिंदू- मुस्लिम ऐक्याने साजरे करतात.  

या मंडळात नाना कोकितकर, अमित कोकितकर, अशपाक मुरसल, सागर कोकितकर, मयुर कोकितकर, अनिकेत रेडेकर, अनिकेत थोरवत, चिन्मय पाटक, दीपक भूड्याळकर, रोहन झोकाडे, राहूल घूगरे, प्रदयुमन भोसले व सर्व कोकितकर परिवार सदस्य, मित्र मंडळ यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.