Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात 'नो व्हेईकल डे' उपक्रमास चांगला प्रतिसाद


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
येथील शिवराज महाविद्यालयात 'नो व्हेईकल डे' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. 

महाविद्यालयाच्या एन.सी.सी व क्रीडा विभागाने पर्यावरणपूरक 'विना वाहन दिवस' हा उपक्रम राबविण्यास सुरू केला आहे. प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. एस.एम. कदम यांनी दिली. आज ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. 'विना वाहन दिवस' रोजी महाविद्यालय परिसरात पेट्रोल, डिझेलच्या दुचाकी व चारचाकीना प्रवेश मनाई करण्यात आली. फक्त इको फ्रेंडली वाहनांना प्रवेश देण्यात आला.

शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. एस. एम.कदम यांच्या अधिपत्याखाली महाविद्यालयाचे एन.सी.सी विभाग प्रमुख डॉ.राहुल मगदूम यांनी खेळ व एन.सी.सी. विभागाच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.