पुलावरील पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावरील पाण्याची पातळी आज सकाळी कमी झाली आहे. पाणी ओसरल्याने या मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.
संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीला गुरुवारी रात्री उशिरा पूर आले होते. नदीवरील भडगाव पुलावर हे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळी साडेसहा च्या सुमारास पुलावरील पाण्याची पातळी कमी झाली आहे. या मार्गावरून वाहतुक सुरू झाली आहे.

