
गडहिंग्लज: येथील शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडांगणावरती उभे राहून 75 या अंकाची तयार केलेली प्रतिकृती. (छाया: मज्जिद किल्लेदार)
गडहिंग्लज( प्रतिनिधी): येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था संचलित शिवराज इंग्लिश स्कूलमध्ये "भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव" निमित्त एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी तिरंगी रंगाची वेशभूषा परिधान केले होते. शाळेच्या क्रीडांगणावरती विद्यार्थ्यांनी उभे राहून 75 या अंकाची प्रतिकृती तयार केली होती. त्यामुळे शाळेचा परिसर अत्यंत सुंदर आणि अल्हाददायक वाटत होता.
शिवराज इंग्लिश स्कूलमधून देशाला दिलेल्या या अनोख्या मानवंदनाचे कौतुक होत आहे. संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी या उपक्रमाबाबत कौतुक केले. हा उपक्रम घेण्यासाठी शरद कांबळे, सौ.विमल पाटील, सौ.पूजा देसाई, सौ.दीपिका यादव, सौ अनिता घुगरे, सौ. शर्मिला धबाले, सौ.समिना नदाफ, सौ. स्मितल कोरडे, सौ. वेरोनिका बार्देस्कर, सौ निर्मला बार्देस्कर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
