गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगांव बेरड गल्ली येथील परशुराम कलापा जकापगोळ यांच्या घराची भिंत कोसळून अंदाजे २० हजाराचे नुकसान झाले.
सध्या संततधार पाऊस, जोरदार वारा सुटत आहे. यामुळे भडगाव येथील परशुराम जकापगोळ यांच्या राहत्या घराची भिंत काल रात्री साडे आठ वाजता कोसळली. यामुळे अंदाजे वीस हजाराचे नुकसान झाले आहे.

