Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीच्या तौफिक साबखान यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

🔘सापडलेले अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र केले परत


गडहिंग्लज (प्रतिनिधी): सापडलेले अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत करून तेरणीच्या तौफिक बाबासाहेब साबखान या युवकाने प्रामाणिकपणाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

 याबाबतची अधिक माहिती अशी की, तेरणी येथील सौ. शितल रत्नाप्पा परीट यांचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र गुरुवारी महालक्ष्मी मंदिर परिसरात हरवले होते. शोधाशोध करून देखील हे मंगळसूत्र सापडत नव्हते. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने लाऊड स्पीकरद्वारे गावात याची माहिती देण्यात आली. ज्यांना हे मंगळसूत्र सापडले आहे त्यांनी परत करण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. दरम्यान, तौफिक साबखान यांना हे मंगळसूत्र सापडले. त्यांनी तात्काळ संपर्क साधत हे मंगळसूत्र परीट यांना परत केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल तेरणी गावात त्यांचे कौतुक होत  आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.