Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांचा ७९ वा वाढदिवस उत्साहात

गडहिंग्लज : वाढदिवसानिमित  शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांचा सत्कार करताना ऋग्वेदी मठाचे आनंद गोसावी महाराज. यावेळी श्रीमती छाया पताडे, सौ. क्रांतीदेवी कुराडे, डॉ.अनिल कुराडे बसवराज आजरी, प्रा.सुनील शिंत्रे यांच्यासह इतर. (छाया : मज्जिद किल्लेदार)  

गडहिंग्लज
(प्रतिनिधी) :  येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांचा ७९ वा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती छाया पताडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्वेदी मठाचे आनंद गोसावी महाराज उपस्थित होते.

 प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बसवराज आजरी यांनी केले. समाजात चांगल्या कार्याने प्रेरित झालेली व्यक्तिमत्व नेहमीच अग्रेसर राहतात त्यांच्या कार्यातून समाजाची जडणघडण होत असते. ही समाजासाठी सदैव मोलाची आहे. प्रा. किसनराव कुराडे यांनी समाजासाठी दिलेले योगदान मोलाचे आहे त्यांनी शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे असे प्रतिपादन ग्वेदी मठाचे आनंद गोसावी महाराज यांनी केले. प्रा. किसनराव कुराडे यांनी आईच्या संस्कारातून आम्ही खरे घडलो. आचार-विचारांची प्रतारणा न करता जीवन सामाजिकतेने जगण्यात धन्यता मानली आहे. व्ही.टी. काका व डॉ.घाळी साहेब यांच्या कार्याचा वारसा चालविण्यात मी समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात प्रा.किसनराव कुराडे व सौ. क्रांतीदेवी कुराडे यांचा सत्कार विद्या संकुलाच्यावतीने ग्वेदी मठाचे आनंद गोसावी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ग्वेदी मठाचे आनंद गोसावी महाराज यांचा सत्कार डॉ.अनिल कुराडे, सौ.बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महालक्ष्मी यात्रा कमिटी, बाळूमामा देवस्थान कमिटीच्यावतीने व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रा. किसनराव कुराडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ॲड.व्ही.एस.पाटील, आजरा कारखाना चेअरमन प्रा.सुनील शिंत्रे, रमेश रिंगणे, राजन पेडणेकर, प्रा.शिवाजीराव भुकेले, राष्ट्र सेवा दलाचे हसन देसाई, समीक्षक चंद्रकांत निकाडे, एम.डी.देसाई, मनसेचे नागेश चौगुले, अविष्कारचे संजय पवार, राजगोंड पाटील, सोमगोंडा आरबोळे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, श्री. करंबळकर गुरुजी, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले आदींनी आपल्या भाषणातून प्रा.कुराडे यांना शुभेच्छा दिल्या. 

गडहिंग्लज : वाढदिवसानिमित शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांना शुभेच्छा देताना शिवराज इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांच्यासह इतर .                 (छाया : मज्जिद किल्लेदार )
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, शंकर नंदनवाडे-गुरुजी, एम. के. सुतार, वाचनकट्टा कोल्हापूरचे युवराज कदम, रामभाऊ चव्हाण, इलियास बारदेस्कर, प्रकाश शहा, बाबासाहेब पाटील, प्रा.सुनील देसाई, केरबा पेडणेकर, प्राचार्य सुरेश चव्हाण, विठ्ठल भमानगोळ, ऐनापुरचे सरपंच बाळासाहेब देसाई, प्राचार्य श्री कुरबेट्टी, आप्पा शिवणे, संजय पाटील, मनोज पोवार, बाळासाहेब सुतार, सुरेश कोळकी, मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे, वीरशैव लिंगायत समाज,बेलबाग, महात्मा बसवेश्वर पुतळा समितीचे राजशेखर दड्डी, नागाप्पाना कोल्हापुरे, राजू हंजी, विठ्ठल- मारुती मंदिर कमिटीचे सोमगोंडा देसाई, सुधीर पाटील, अरविंद पाटील, जवाहर घुगरे, आप्पासाहेब बस्ताडे यांच्यासह प्रा.कुराडे यांच्यावर प्रेम करणारे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले तर आभार पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.