गडहिंग्लज(प्रतिनिधी): "आजादी का अमृतमहोत्सव" कार्यक्रमांतर्गत तेरणी (तालुका: गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपल्या कलेचे प्रदर्शन केले. या स्पर्धांचा निकाल कार्यक्रमाच्या समारोप दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह, कर्मचारी, मराठी विद्यामंदिरचे शिक्षक तसेच ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर यांनी परिश्रम घेतले.






