Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचा सन्मान झाला पाहिजे : डॉ.सुधीर मुंज

गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ .सुधीर मुंज. यावेळी डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस .एम. कदम व इतर . (छाया: मज्जिद किल्लेदार)  

गडहिंग्लज
(प्रतिनिधी) :  भारत देश अनेक स्वातंत्र्यवीरांनी केलेल्या बलिदान, त्यागातून स्वतंत्र झाला आहे. अशा शूरवीरानी दिलेल्या बलिदानाचे सर्वांनी स्मरण करावे. त्यांच्या बलिदानाच्या स्मृती जागृत ठेवूया आणि स्वातंत्र्याचे सुराज्यात रुपांतर करुन या देशाला पुढे नेऊया. आपल्या भारत देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचा सन्मान झाला असे प्रतिपादन डॉ.सुधीर मुंज यांनी केले.

 येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम.कदम होते. तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, मारीयम बारदेस्कर, तात्यासाहेब किल्लेदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ.बी.एम.जाधव यांनी केले.

यावेळी भारतीय स्वातंत्र्य संग्रामया विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.मुंज म्हणाले,  आपल्या नव्या पिढीला भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामाचा इतिहास समजणे आवश्यक आहे. आपल्य़ा देशाला  स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. देशासाठी आपले रक्त सांडले आहे. त्यामुळे आपला देश खऱ्याअर्थी स्वतंत्र झाला असेही डॉ. सुधीर मुंज यांनी सांगितले. चळवळीतून स्वातंत्र्य मिळाले हे अर्धसत्य आहे. जगामध्ये ज्यांना-ज्यांना स्वातंत्र्य मिळाले तेथे युद्ध झाले आहे. असाच स्वातंत्र्य संग्राम आपल्या देशासाठी झाला आहे हे कोणीही विसरू नये. यावेळी स्वातंत्र्यापूर्वी हिंदुस्थानात समाजामध्ये राष्ट्रीय एकात्मता होती. त्यामुळेच स्वातंत्र्य संग्रामाचा लढा तीव्र झाला. त्यातूनच भारत देशाला १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या इतिहासाचा सविस्तर उलगडा केला.

या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण पतसंस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सचिन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अर्थशास्त्र व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जी.जी. गायकवाड़, डॉ.बी.डी.अजळकर, नॅक समन्वयक प्रा. किशोर अदाटे,  ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक  प्रा. तानाजी चौगुले  यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार डॉ.वृषाली हेरेकर यांनी मानले.



  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.