![]() |
| गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात व्याख्यानमालेत बोलताना प्रा. गौरव पाटील. यावेळी सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम. कदम. (छाया : मज्जिद किल्लेदार) |
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक
प्रा.राहुल कुंभार यांनी केले. यावेळी संभाजीराव
माने ज्युनिअर कॉलेजचे माजी पर्यवेक्षक प्रा.वि.मा.सुरंगे यांना महाविद्यालयात
भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे
यांनी प्रा.वि.मा.सुरंगे यांच्या कार्याला उजाळा देऊन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी “भारतीय स्वातंत्र्य आणि
आझाद हिंद फौज' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा.पाटील म्हणाले, नेताजी
सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद फौजेने भारतीय स्वातंत्र्य संग्रामात झोकून दिले
होते. आपल्या मातृभूमीला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आझाद हिंद
फौजेच्या क्रांतिकारकांनी मोलाचे योगदान दिले आहे. हे आजच्या पिढीने जाणून घेतले
पाहिजे. आझाद हिंद फौजेने ब्रिटीश सत्तेला उलथवून टाकण्यासाठी सर्वस्व अर्पण केले
आहे. स्वातंत्र्य संग्रामाचा हा प्रवास अत्यंत खडतर असा होता. त्यामध्ये आझाद हिंद
सेनेने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली हे स्वातंत्र्य संग्राम
आक्रमकपणे लढले गेले आहे. यावेळी प्रा. पाटील यांनी आझाद हिंद फौजच्या कार्याचा इतिहासाचा
सविस्तरपणे सांगितले. फिजिक्स व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने आयोजित या
कार्यक्रमास प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज, डॉ.जी.डी.अजळकर, ग्रंथपाल संदीप कुराडे, पर्यवेक्षक प्रा.तानाजी
चौगुले, यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेबक व
विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा.तेजस्विनी शिंदे
यांनी मानले.


