Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवराज महाविद्यालयात डॉ . एस. आर.रंगनाथन यांची जयंती साजरी

गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करताना सचिव डॉ. अनिल कुराडे व प्रा. सौ. बिनादेवी कुराडे. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.                               (छायाचित्र : मज्जिद किल्लेदार)

गडहिंग्लज
(प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालय ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम होते.

प्रारंभी ग्रंथपाल संदीप कुराडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे व प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथालयशास्त्रातील विविध पुस्तकाचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी मांडण्यात आले. याचा लाभ महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमास पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सुधीर मुंज, डॉ. बी. डी. अजळकर, डॉ. राजेंद्र गुंडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.