Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमित्त तेरणीत विविध कार्यक्रम उत्साहात


गडहिंग्लज (प्रतिनिधी)
:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त तेरणीत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.

यावेळी हर घर तिरंगा, गोपाळांची पंगत व आरोग्य शिबिर घेण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मराठी विद्या मंदिर, अशोक रावसाहेब देसाई हायस्कूल, उर्दू शाळा यासह विविध संस्थांनी ध्वजारोहण केले.

हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवला. अशोक रावसाहेब देसाई हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सकाळी गावातून प्रभातफेरी काढली. ग्रामस्थांना ध्वज कसा पडकवावा याबाबत मार्गदर्शन केले.आरोग्य शिबिरात आरोग्य सेविका सौ. जयश्री कांबळे यांच्यासह त्यांच्या टीमने आरोग्य तपासणी केली.

यावेळी सरपंच मोसीम मुल्ला,उपसरपंच आक्काताई हजेरी, ग्रामसेवक निवृत्ती कोंडूस्कर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.